लोणावळ्यातील भूशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी

पुणे | लोणावळ्यातील भूशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या ४८ तासापासून पाण्याचा प्रवाह वाढला आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचललंय. 

पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर पर्यटकांना पुन्हा पायऱ्यांवर बसण्याचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. 

दरम्यान, शनिवारी आणि रविवारी दुपारी तीननंतर भूमी डॅमकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या