लोणावळा दुहेरी हत्याकांडातील दुसरा आरोपी जेरबंद

पुणे | लोणावळा दुहेरी हत्याकांडातील दुसऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याला आग्र्यातून ताब्यात घेण्यात आलं. रविवारी याप्रकरणातील पहिला आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. 

सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांची चोरीच्या उद्देशाने लोणावळ्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा छडा लागत नसल्याने याप्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या