लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पुण्यातील तरुणाचा मृत्यू

पुणे | लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झालाय. संतोष सोनकांबळे असं या तरुणाचं नाव असून तो हडपसरचा रहिवासी आहे. 

भुशी डॅम परिसरात घालण्यात आलेली बंदी प्रशासनाने उठवली होती. नेमका त्याच्या पहिल्याच दिवशी हा अपघात घडला.

भुशी डॅम परिसरातील डोंगरावर चढत असताना संतोषचा पाय घसरला. यावेळी खाली पडलेल्या संतोषच्या डोक्याला जबर मार लागला त्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या