सरकारचे धाबे दणाणले, विधान भवनासह दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मुंबई | किसान लाँग मार्चमुळे सरकार हवालदिल झाल्याचं चित्र आहे. कारण विधान भवन, मंत्रालयासह दक्षिण मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

आपल्या न्याय मागण्यांसाठी किसान लाँग मार्च नाशिकपासून मजल-दरमजल करत मुंबईत दाखल झाला आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी विधान भवनाला घेराव घालणार आहेत. 

दरम्यान, नामुष्की टाळण्यासाठी फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. मात्र दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याने सरकारचे धाबे दणाणल्याचं बोललं जातंय.