बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम बाॅर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, फोटो व्हायरल

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची सगळीकडेच चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. आज केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं ‘भारत बंद’ची हाक पुकारली आहे. याचा परीणाम आता दिसून येत आहे. दिल्ली आणि गुरुग्राम सीमेवर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून येत आहे.

भारत बंदमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. दिल्ली-गुरुग्राम सीमेवर सकाळपासून झालेल्या ट्रॅफिक जाममुळे कार्यालयात जाणारे लोक वाटेतच अडकले आहेत. केएमपी एक्सप्रेसवेवर शेतकरी बसले असल्यामळे पोलिसांनी एक्स्प्रेस वे बंद केला आहे.

NH 24 आणि NH 9 दोन्ही ब्लॉक करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी ट्विट करुन या जामबद्दल सतर्क केलं आहे. यूपी ते गाझीपूरपर्यंतची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, कृषी कायदे हटवणं आणि शेतमालाला किमान हमीभाव कायदाच्या मागणीसाठी सुरु असलेला ऐतिहासिक शेतकरी संप 10 व्या महिन्यात पोहोचला आहे. यामुळे आता भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. आज भारत बंद सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून CSKच्या ‘या’ खेळाडूनं आयपीएल सुरू असतानाच घेतला निवृत्तीचा निर्णय!

मोठी बातमी! शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांना ईडीनं ताब्यात घेतलं

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत वसूल करण्यात आला ‘इतक्या’ कोटींचा दंड

प्रत्येक भारतीयाला मिळणार हेल्थ कार्ड, पंतप्रधान मोदी करणार आयुष्मान डिजिटल मिशनचा प्रारंभ

विदर्भ-मराठवाड्याच्या बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More