बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आठ दिवसानंतर वाईन शॉप उघडल्याने बीडमध्ये मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा

बीड | कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच राज्यभरातील सर्व दारूची दुकाने, बियर बार तसेच परमिट रूमही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता बीडमध्ये तब्बल आठ दिवसांनंतर आज वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आज सकाळी वाईन शॉप उघडल्यानंतर मद्यप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. परिणामी वाईन शॉप बाहेर लांबच लांब रांगा लावून लोकांना दारूची खरेदी करावी लागली.

आजपासून महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. ज्यानुसार जिल्हाअंतर्गत तसेच आंतरजिल्हा प्रवासावर पूर्णतः बंदी असणार आहे. तसेच अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. त्यातच आज आठवडाभरानंतर वाईन शॉप उघडल्याने मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं.

माजलगाव शहरातील वाईन शॉप बाहेर मद्यप्रेमींची झुंबड उडाल्याने त्यांना एका रांगेत उभं करण्यात आलं आणि एक एक करून दारूची विक्री करण्यात आली. या सर्व गोष्टीमध्ये नागरिकांनीही प्रतिसाद देत सोशल डिस्ट्न्सिंगचं पालन करत दारूची खरेदी केल्याचं चित्र पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या –

राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षेबाबत उदय सामंत यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“नाशिकचा कायापालट करतो अन्यथा तोंड दाखवणार नाही”; फडणवीसांच्या ‘त्या’ भाषणावर काँग्रेसचं टीकास्त्र

…त्यानंतर औद्योगिक घटकांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार सुरू- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

ऑक्सीजन मास्क काढून कोरोनाबाधित रुग्ण गेला पळून; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

दिलासादायक! ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टनमला पोचली, लवकरच महाराष्ट्रात परतणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More