बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजेश्वरीच्या सिल्क साडीवर खिळल्या नजरा, हा Hot डान्स पाहाल तर पाहातच राहाल!

मुंबई | फॅंड्री चित्रपटातील शालू उर्फ अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या चाहत्यांसाठी विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यातच आता राजेश्वरी खरातने निळ्या साडीवरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शालूचे चाहते या डान्सवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

राजेश्वरी खरात तिच्या पारंपारिक लूकपासून हॉट आणि बोल्ड लूकने तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या शालूने फेसबूकवर टाकलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. मैं दिवाणी बन गई, या  गाण्यावर अदा करत आहे. तिच्या या डान्सने अनेक चाहत्यांना भूरळ घातली आहे. शालू आणि जब्याला पुन्हा एकत्र पाहायचं आहे, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

राजेश्वरी खरात अनेकदा ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर येत असते. काही दिवसांपूर्वी  राजेश्वरी खरातने रेडलाईट या लघूपटामध्ये काम केलं होतं. या लघूपटाच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे थरारक आयुष्य दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, राजेश्वरी खरातने फॅंड्री चित्रपटाच्या माध्यमातून 2013 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.  त्यानंतर राजेश्वरीने आयटम गिरी या चित्रपटामध्ये काम केलं. अल्पावधीतच राजेश्वरी खरातने चांगलं नाव कमावलं आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे राजेश्वरीच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात.

पाहा व्हिडिओ-  


थोडक्यात बातम्या-

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला मातोंडकरचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…

“एक हजार पाकिस्तानही लतादीदींच्या जाण्याची पोकळी भरुन काढू शकत नाही”

“मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर माझ्या हत्येचा कट ठाकरे सरकार रचत आहे”

नितेश राणेंची प्रकृती खालावली; ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असं स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार तयार करेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More