बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुरुष पळाले पण देशासाठी एकच महिला लढत होती, अखेर सलीमाला तालिबान्यांकडून अटक

काबुल | अफगाणिस्तानमधील परिस्थिती आता तालिबानच्या ताब्यात आहे. तालिबान दहशतवादी आपल्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी उद्ध्वस्त कराव्या वाटत आहेत. त्या सर्वांचं नुकसान करत आहेत. प्रत्येक राज्यावर तलिबानने आपला कब्जा मिळवला आहे. कित्येक खासदार, मंत्री, अधिकारी, हे आपल्या देशाला अडचणीत असताना सोडून गेले आहेत. राष्ट्रपती उपराष्ट्रपती तर पैसा घेऊन पळाले आहेत.

महिला जसं घर सांभाळू शकतात तेवढ्याच सक्षमपणे त्या देशसुद्धा सांभाळू शकतात. अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गवर्नर या तालिबानसोबत आपली सगळी ताकद लाऊन लढताना पहायला मिळत होत्या. सलीमा मजारी या अफगाणिस्तानच्या शौर्याचं प्रतिक बनल्या आहेत. आपल्या देशाचा राष्ट्रपती पळून गेला असताना सलीमा या शेवटपर्यंत लढत होत्या.

सलीमा मजारी या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गवर्नर आहेत. सलीमा या बल्ख प्रांतातील चाहर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. येथील एकूण लोकसंख्या जवळपास 32 हजारांहून अधिक आहे. पण त्यांनी शेवटपर्यंत तालिबानला आपल्या भागावर ताबा मिळवू दिला नाही. या भागासाठी तालिबान्यांना बराच संघर्ष करावा लागला आहे. एकिकडे आपल्या देशाच सर्वोच्च सरकार हे तालिबानसमोर गुडघे टेकत होत, तेंव्हा सलीमा या आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या बळावर तलिबानला रोखत राहिल्या.

तालिबानच्या राक्षसी दहशतवाद्यांसमोर त्या काल कमी पडल्या. मुळच्या त्या इराणच्या आहेत. सोवियत य़ुनियनच्या संघर्षात त्या अफगाणिस्तानला आल्या होत्या. अफगाणिस्तानलाच त्यांनी आपली कर्मभूमी बनवलं अन् याचं अफगाणिस्तानसाठी त्या शेवटपर्यंत लढत होत्या. आता त्या तालिबानच्या अटकेत आहेत.

थोडक्यात बातम्या 

राज्यात सर्वदूर पाऊस?, हवामान खात्याचा अत्यंत महत्त्वाचा इशारा

अफगानिस्तानच्या पळपुट्या राष्ट्रपतींचा छडा लागला, कुटुंबासह लपलेत इथं!

संभाजी ब्रिगेडनं दिलं ‘हे’ चॅलेंज, राज ठाकरे चॅलेंज स्वीकारणार का?

तालिबानला आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अमेरिका ‘अशी’ जिरवणार खोड!

‘तो’ टाईमपास आता बंद करा; उदयनराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More