महाराष्ट्र मुंबई

पियूष गोयल यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले….

मुंबई | स्थलांतरित मजुरांची ठाकरे सरकारला अजिबात काळजी नाही. हे सरकार त्यांची काळजी घेण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे असा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केला आहे.

माझं महाराष्ट्रातल्या स्थलांतरित मजुरांच्या अवस्थेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की शक्य ती व्यवस्था करा पण महाराष्ट्रातले स्थलांतरित मजूर घरी गेले पाहिजेत. आम्ही त्यानुसार आमच्याकडून अर्थात केंद्राकडून सगळे उपाय योजतो आहोत, असं पियुष गोयल यांनी सांगितलं आहे.

सध्या रेल्वेचे कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. आम्ही महाराष्ट्रासाठी 145 ट्रेन पाठवल्या. त्याबाबतची सगळी माहिती राज्य सरकारला दिली आहे.मात्र आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74 ट्रेन सुटायच्या होत्या. सकाळपासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत कोणीही प्रवासी या ट्रेन्समध्ये बसले नाहीत. तसंच आत्तापर्यंत 24 ट्रेन्स सुटल्या आहेत. 50 ट्रेन्स अजूनही फक्त उभ्या आहेत, असं गोयल यांनी म्हटलंय.

दरम्यान, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहेत. मात्र त्यांच्या अंतर्गत भांडणात ते गुंतले आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या मजुरांची चिंता नाही, असंही गोयल यांनी म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

केंद्राने ठाकरे सरकारला आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी

महत्वाच्या बातम्या-

विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या