बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितेश राणे आणि नीलम राणे यांच्यावरोधात लुकआऊट नोटीस जारी

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अक्षेपार्य वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता राणे कुटुंबीयांना आणखी एक धक्का बसला आहे.

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरूद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. यासह आणखी 30 जणांना देखील ही नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. डीएचएफएल कर्ज प्रकरणात नितेश आणि नीलम राणे यांना नोटीस देण्यात आल्याचं समोर येतंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

नारायण राणे यांच्या कंपनीने डीएचएफएलकडून कर्ज घेतलं होतं. मात्र, कंपनीने घेतलेलं कर्ज वेळेत फेडलं नाही. त्यानंतर हा वाद चांगलाच चर्चेत आला होता. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने 25 कोटींचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड न केल्यानं तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांकडून 3 सप्टेंबर रोजी ही नोटीस देण्यात आली होती.

संबंधीत कंपनीत नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. तर नीलम हाॅटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 40 कोटींचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी ही नोटीस दिली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील हे पत्र देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

वाझेंसोबत सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या महिलेबाबत धक्कादायक माहिती समोर, NIA दिलं स्पष्टीकरण

‘या’ दोन नेत्यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनवेळा पंतप्रधान झाले- असदुद्दीन औवेसी

‘तालिबान्यांचं सरकार फक्त सहा महिने टिकणार त्यानंतर….’; अफगाणिस्तानमधील मोठी माहिती समोर!

‘अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी…’; भाजपच्या ‘या’ नेत्यांचं पवारांना आव्हान

#T20WorldCup| …म्हणून चहलच्या जागी राहुल चहरला मिळाली संधी; निवडकर्त्यांने दिलं स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More