नवी दिल्ली | बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी आली आहे. पंजाबमध्ये मागील महिन्यात गायक सिद्धू मोसेवाला (Siddhu Mosewala) याच्या हत्येमागच्या मुख्य सूत्रधार माफिया लॉरेन्स बिश्र्नोई (Lorens Bishnoi) सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यावेळी स्पेशल सेलच्या चौकशी दरम्यान त्याने ही माहिती दिली. माध्यमांच्या माहितीनुसार बिश्र्नोई चौकशीत म्हणाला. काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला माफ करणार नाही.
राजस्थानातील बिश्र्नोई समाज काळवीट प्राण्याला देव मानतात. सलमान खानने 1998 साली ‘हम साथ साथ है’ (Hum Sath Sath Hay Movie) या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान राजस्थानात काळवीट प्राण्याची शिकार केल्याचा आरोप झाला होता. त्याप्रकरणी सलमानला तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली होती. आता या प्रकरणात बिश्र्नोई टोळीने उडी घेतली आहे.
सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांनी जनतेसमोर येऊन जाहीररित्या आपल्या समाजातील लोकांची माफी मागावी लागेल, जर खानने तसे केले नाही, तर आम्ही त्याला मारुन टाकू, असे लॉरेन्स बिश्र्नोई म्हणाला. लॉरेन्स बिश्र्नोई फक्त 28 वर्षांचा असून त्याच्या टोळीतील इतर गुंड 20 ते 25 वयोगटातील आहेत.
इतक्या कमी वयात या सर्वांवर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. स्वत: लॉरेन्स बिश्र्नोईवर 50 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. लॉरेन्स बिश्र्नोई आणि त्याच्या टोळीने आतापर्यंत केलेले गुन्हे पाहाता त्यांच्याकडून सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीमुळे मुंबई आणि दिल्ली पोलिसांची झोप उडाली आहे.
थोडक्यात बातम्या –
शिवसेनेची हकालपट्टी मोहीम सुरुच, आणखी एका बंडखोर आमदाराला दिला नारळ
‘अब सभी को सभी से खतरा है’, संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ
आता विमानप्रवास करा फक्त 26 रुपयांत, व्हिएतजेट एअरलाईन्सची खास ऑफर
‘हजारो रुपयांची दाढी कटींग करून पैश्यांच्या जोरावर आलेलं हे सरकार’, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
‘सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’; निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
Comments are closed.