Top News महाराष्ट्र मुंबई

निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो- शिवसेना

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीएला कडवी टक्कर देणाऱ्या तेजस्वी यादव यांचे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून कौतुक करण्यात आलं आहे.

निवडणूक हारणं हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

बिहारची सुत्रं कोणाच्या हाती जायची ते जातील, पण या निवडणुकीने देशाला तेजस्वी नावाचा नवा मोहरा दिल्याचे सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे. बिहार निवडणुकीच्या काळात भाजप्रणित एनडीए आणि तेजस्वी यादव महागठबंधनामध्ये प्रचंड चुरस पहायला मिळाली.

दरम्यान, बिहार विधानसभेच्या निवडणुकात एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीएने तर 110 जागांवर महागठबंधनच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीवर मुंबई भारी; पाचव्यांदा जिंकली आयपीएलची ट्राॅफी!

‘विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं’; तेजस्वी यादव यांचा खळबळजनक आरोप

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे, पण…- शरद पवार

“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”

संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या