Top News देश

प्यार किया तो डरना क्या?, ‘त्या’ दोघींनी त्याची चक्क वाटणी करुन घेतली

Photo Courtesy- Pixabay

रांची |  पती, पत्नी और वो, अशी अजब गजब घटना झारखंडची राजधानी रांचीमध्ये घडली आहे. प्रेयसी आणि पत्नीने मिळून विवाहित पुरुषाची वाटणी करुन घेतली आहे. राजेश महतो नावाच्या या व्यक्तीला पत्नी आणि एक मुलगा आहे. यावर आता एक पत्नी असताना त्याच्यावर दुसऱ्या महिलेसोबत त्याने लग्न केल्याचा आरोप आहे. मात्र आता हे प्रकरण सेटल झालं असून दोघींनी त्याची वाटणी करुन घेतली आहे.

अविवाहित असल्याचं सांगत राजेशने एका महिलेला आपली प्रेयसी बनवलं होतं. राजेशच्या पत्नीला जेव्हा हे कळालं तेव्हा तीने त्याला त्याच्या या प्रेयसीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तो तिच्यासोबत फरार झाला. त्यानंतर राजेशच्या पत्नीने पोलिसात पती गायब असल्याची तक्रार नोंदवली होती. प्रेयसीच्या घरच्यांनीही राजेश विरोधात अपहरणाची केस केली होती.

न्यायालयाने राजेशच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. पोलिसांनी दोघांना अटक केली, त्यानंतर जेव्हा राजेशची पत्नी आणि त्याची प्रेयसीच्या एकमेकींच्या समोर आल्या, तेव्हा तो विवाहित असल्याचा भांडाफोड झाला. त्याने प्रेयसीला पळवून तिच्याशी लग्नही केलं होतं. राजेशचं लग्न झाल्याचं लक्षात आल्यानंतर प्रेयसीलाही संताप अनावर झाला. तीनंही त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केली.

दरम्यान, हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर त्यांच्यात एक समझोता करण्यात आला. दोन्ही पत्नींमध्ये त्याची वाटणी करण्यात आली. आठवड्याचे तीन दिवस एका पत्नीला तर तीन दिवस दुसऱ्या पत्नीला देण्यात आले, एक दिवस स्वतःच्या मर्जीने राहण्याचा अधिकार त्याला देण्यात आला. मात्र हा समझोता जास्त दिवस टिकू शकला नाही, अशीही माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग… लगीन देवाचं लागतं… पाहा व्हिडीओ

टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; बीडमधला संशयित फरार!

भारतीयांना जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमवर दिवस-रात्र क्रिकेट सामना पाहण्याची संधी

सावधान!!! कोरोनाचा धोका वाढतोय, आता महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही संचारबंदी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या