प्रेम आंधळ असतं! 40 वर्षाची 4 मुलांची आई 20 वर्षाच्या प्रियाकरासोबत झाली फरार अन्…
डेहराडून | प्रेमात माणूस काहीही करु शकतं म्हणजे थोडक्यात प्रेम हे आंधळ असतं, असं म्हटलं जात. या वाक्याचा प्रत्यय देणारी एक घटना उत्तराखंडमधल्या डेहराडून येथे समोर आली आहे. आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या तरुणासोबत 40 वर्षाच्या 4 मुलांच्या आईचे प्रेमसंबंध असून या महिलेने तीच्या प्रियकरासोबत पळ काढला. या कारणामुळे महिलेच्या पतीने आपल्या चार मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली.
20 वर्षाच्या तरुणासोबत असलेल्या महिलेच्या संबंधांबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. मात्र जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही एकाच भागात राहणारे होते. दोघेही पळून गेल्यानंतर पतीने त्यांना शोधण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. 20 दिवसानंतर महिला उत्तराखंडमधल्या मुजफ्फरनगरमध्ये असल्याचं समोर आलं. त्यानंतर महिलेला घरी आण्यातं आलं. मात्र 20 वर्षाचा तीचा प्रियकर अजूनही फरार आहे.
महिलेल्या घरी आण्यात आलं असून ती कायमसाठी राहायला आलेली नाही. महिलेने तीच्या पती आणि मुलांसोबत राहण्यास नकार दिला आहे. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी देखील तीला खुप समजवलं. मात्र महिलेने तीच्या प्रियाकरासोबतच राहणार असल्याचं सांगितलं. यामुळे या प्रकरणाला घरीच चर्चा करुन सोडवावा असा पोलिसांकडून सल्ला देण्यात आल्यामुळे महिलेच्या पतीला कुठूनही दिलासा मिळनं कठीण आहे.
दरम्यान, याआधी सुद्धा एका महिलेचं चार तरुणांवर प्रेम असल्यामुळे चारही तरुणांसोबत पळून गेल्याची घटना समोर आली होती. मात्र त्यानंतर कोणासोबत लग्न करावं असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पंचायतीने चिठ्या उधळून हा निर्णय घेतला होता. प्रेमात पुढचा मागचा विचार न करता विचित्र पाऊल उचललं जात असल्यामुळे आता प्रेम खरचं आंधळ झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.
थोडक्यात बातम्या-
अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवारांचं ट्विट; म्हणाले…
“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधीना शाळेत पाठवण्यात यावं”
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यावर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांचं मोठं वक्तव्य!
…अन् भरबैठकीत नाना पटोले संतापले; ‘या’ मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर व्यक्त केली नाराजी
सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या
Comments are closed.