लव्ह जिहाद नव्हे, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘तो’ निकाह वैध!

तिरूअनंतपुरम | ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात केरळ हायकोर्टाचा आदेश रद्दबातल ठरवत सर्वोच्च न्यायालयाने हादियाचा निकाह वैध ठरवला आहे.

मागील वर्षी हादियाने मुस्लीम धर्म स्वीकारत शफी जहाँ नावाच्या माणसांसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर या लग्नाविरोधात तिच्या वडिलांनी न्यायालयात दाद मागितली होती.

या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ मानत केरळ हायकोर्टाने हे लग्न अवैध ठरवलं होतं. शफी जहाँ यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

दरम्यान, या निर्णयामुळे हादियाला मोठा दिलासा मिळाला असून आता ती आपल्या पतीसोबत राहू शकणार आहे.