यशश्री शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ लाँग मार्च, उरणमध्ये संतापाची लाट

Love Jihad Uran News Case Marathi News Update

Love Jihad Uran | रायगड जिल्ह्यात उरण येथे एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे आता उरणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तरूणीच्या मारेकऱ्यांना शोधावं म्हणून आज स्थानिक नागरिक लाँग मार्च काढणार आहेत. त्यावेळी कोणताही अनुचित प्रचार घडू नये, यामुळे उरण पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आज सकाळी फुल मार्केट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून लाँग मार्च मोर्चासाठी सुरूवात करणार होते. याप्रकरणाविरोधात असंख्य नागरिक आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. यशश्री शिंदेंच्या (वय 22) मारेकऱ्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी उरण येथे करण्यात आली आहे. (Love Jihad Uran)

उरण बंदची हाक

दुसरीकडे पोलिसांचं एक पथक हे कर्नाटकला गेलं आहे. त्याठिकाणी आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यशश्री शिंदे शुक्रवारी रात्री पनवेल-उरण रेल्वे मार्गावर तिचा मृतदेह सापडला. तिच्यावर हल्ला करत तिच्या शरीराचे अवयव कापण्यात आले. यशश्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याठिकाणी अनेकांनी शोक व्यक्त केला. यामुळे बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी उरण बंदची हाक दिली.

लव्ह जिहादमुळे झाली हत्या

यशश्रीची लव्ह जिहादमुळे (Love Jihad Uran) हत्या झाली असल्याचं बोललं जात आहे. तिच्या कुटुंबाने देखील हाच दावा केला आहे. याचे पडसाद आता राज्यात उमटू लागल्याची शक्यता आहे. दरम्यान यशश्री सकाळी 11 वाजता मौत्रिणींकडे गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर उरण रेल्वे स्टेशनजवळ तिचा मृतदेह सापडला असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. (Love Jihad Uran)

ती बेलापूर येथे नोकरी करत होती. ती तिथून हाफडे घेऊन निघून आली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथकं स्थापन केली. त्यापैकी एक पथक सध्या कर्नाटकात गेलं आहे. (Love Jihad Uran)

News Title – Love Jihad Uran News Case Marathi News Update

महत्त्वाच्या बातम्या

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, ऐश्वर्याला अभिषेककडून मोठ सरप्राईज!

गुड न्यूज! आयफोन झाले स्वस्त, नव्या किमती ऐकून विश्वास बसणार नाही

राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट

तब्बल 16 वर्षांनंतर ‘या’ प्रसिद्ध कलाकाराने सोडली TMKOC मालिका!

‘भावी मुख्यमंत्री’, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरात झळकले बॅनर

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .