बीड | प्रेमी जोडपं पळून गेल्यानं मुलीच्या घरच्यांनी मुलाची गुलाल, शेंदूर लावून धिंड काढली. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आर्वी इथं हा प्रकार घडला आहे.
25 एप्रिलला हे जोडपं औरंगाबादला पळून गेलं होतं. काही दिवसांनी मुलीच्या घरच्यांना माहिती समजताच त्यांनी दोघांना पकडलं. रस्त्यातच मुलीला नातेवाईकाच्या घरी सोडून मुलाला नारायणवाडीला नेलं. तिथं त्याला बेदाम मारहाण केली अणि दुसऱ्या दिवशी त्याची धिंड काढली.
हा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी मुलाची सुटका केली. दरम्यान, मुलाच्या जबाबावरुन तब्बल 62 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-राम शिंदे काय करत आहेत??? त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा!!!
-राहुल गांधींनी हातात कागद न घेता 15 मिनिट बोलून दाखवावं- मोदी
-‘तुम खाते जाव, मैं बचाता जाता हूँ’, हे मुख्यमंत्र्यांचे धोरण!
-…म्हणून विनोद तावडे 20 मिनिट राज ठाकरेंची वाट पाहात थांबले!
-भाजप आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात, लवकरच पक्षप्रवेश होणार???
Comments are closed.