मनोरंजन

सलमान खान निर्मित ‘लव्हरात्री’ चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | अभिनेता सलमान खान निर्मित ‘लव्हरात्री’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन हे दोघं या चित्रपटातून बाॅलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटाबाबत सलमानने स्वत: ट्विटरवर ट्विट करत बातमी दिली आहे. लव्हरात्री यह कहानी है प्यार और मोहब्बत की असं त्याने ट्वीटमध्ये लिहिलंय. 

दरम्यान, आयुष शर्मा बरोबरच राम कपूर, राॅनित राॅय हे सुद्धा झळकणार आहे. येत्या 5 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या