Top News औरंगाबाद कोरोना

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन

औरंगाबाद | महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाने औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन 10 ते 18 जुलैदरम्यान असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 6880  रुग्ण आढळले आहेत. मात्र सध्या रूग्ण नवीन रूग्णांची नोंद होत असल्याने पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आलाय.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 150 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 102 रुग्ण तर ग्रामीण भागातील 49 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 85 पुरूष आणि 65 महिलांचा समावेश आहे.

या लॉकडाऊन दरम्यान वाळूजमधील सर्व उद्योगही बंद ठेवण्यात येणार आहेत. या बंददरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेबाबतचे सर्व निर्णय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त स्वतंत्रपणे जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिलीये. विभागीय आयुक्तांसमवेत लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार- उद्धव ठाकरे

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित

महत्वाच्या बातम्या-

भारताचा दणका; टिकटाॅकला इतक्या हजार कोटी रुपयांचा फटका!

कोरोनाची लस तीन महिन्यांत येणार; केंद्रीय आयुष मंत्र्यांचा दावा

सरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करतायत- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या