LPG Cylinder Price | आज 1 जुलैरोजी महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी समोर आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी व्यावसायिक सिलिंडर (19 किलो गॅस) ची किंमत 30 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात
आज, सोमावरपासून देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1646 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी येथे किंमत 1676 रुपये होती. यासोबतच कोलकातामध्ये हा व्यावसायिक सिलिंडर आजपासून 1756 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी कोलकाता येथे किंमत 1787 रुपये होती.
इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, चेन्नईमध्येमध्येही आजपासून व्यावसायिक सिलिंडर 1840.50 ऐवजी 1809.50 रुपयांना उपलब्ध असणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही .सध्या मुंबईत घरगुती सिलिंडर 802.50 रुपयांनी उपलब्ध आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील गॅसचे दर
तर, दिल्लीमध्ये 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये घरगुती सिलिंडरची किंमत आहे. तेल विपणन कंपन्यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी 200 रुपयांची (LPG Cylinder Price) मोठी कपात केली होती. त्यानंतर किंमत 903 रुपयांपर्यंत खाली आली होती. त्यानंतर 9 मार्च 2024 मध्ये 100 रुपयांनी किमती कमी करण्यात आल्या होत्या. आज 1 जुलैरोजी या किमतीमध्ये कोणताही बदलाव झाला नाही.
दरम्यान, महाराष्ट्रात शिंदे सरकारने महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 सालचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पात अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. याद्वारे 56 लाख 16 हजार कुटुंबांना वर्षातून तीन महिने गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. पिवळं आणि केसरी रंगाचं रेशन कार्ड असणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
News Title – LPG Cylinder Price Cut on 1st July 2024
महत्वाच्या बातम्या-
‘वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली….’; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांनी खळबळ
महादेवाच्या कृपेने ‘या’ 5 राशींवर होणार धनवर्षाव!
भर कॉन्सर्टमध्ये गायिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार; प्रायव्हेट पार्टबाबत..
विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी; ‘त्या’ गोष्टीचा ठाकरे गटाने घेतला धसका?
‘ड्रेस घातलेल्या महिलांनी…’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य