बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

नवी दिल्ली |  देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून रान पेटलं असताना घरगुती गॅसच्या किंमतीनीही भडका उडवला आहे. गेल्या महिनाभरात घरगुती गॅसच्या किमतीत जवळपास सव्वाशे रुपयांनी वाढ झाली आहे. देशात कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत असताना आता सर्वसामान्य जनतेला इंधन आणि गॅस दरवाढीला सामोरे जावे लागत आहे.

एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य व्यक्तीचं कंबरडं मोडलं असतानाच आता दैनंदिन जीवनात गरजेचा असणाऱ्या गॅस दरवाढीला सरकारने लगाम लावण्याची गरज असल्याचं मत सामान्य माणूस व्यक्त करत आहे. आज गॅस 25 रुपयांनी महागला असून किंमती नियंत्रणात नाही राहिल्यास जनतेच महिन्यांचं बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या महिन्यात 4 तारखेला 25 रुपये 14 तारखेला 50 रुपये तर 25 तारखेला पुन्हा 25 रुपये अशी दरवाढ घरगुती गॅसमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच आणि पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

इंधन दरवाढीविरोधात सरकारवर नाराज असलेली जनता आता गॅसच्या किंमती वाढवल्याने अजूनच मेटाकुटीला आली आहे. केंद्र सरकार सबसिडी कमी करत आहे आणि गॅसच्या किमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे, आता ग्रामीण भागात उज्वला योजने अंतर्गत देण्यात आलेले गॅस सिलेंडर तसेच पडून राहिले असून लोकांनी पुन्हा चुली पेटवून स्वयंपाक करायला सुरुवात केली असल्याचं दिसुन येत आहे.  गॅसच्या दरात वाढ झाल्यानंतर आज त्याची किंमत मुंबईमध्ये 819 रुपये एवढी झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”

ते सगळ्यात मोठे गुंड; भर भाषणात हर्षवर्धन जाधवांच्या मैत्रिणीनं केलेल्या आरोपांनी खळबळ

धक्कादायक! भाजपच्या ‘या’ खासदाराचं कोरोनामुळे निधन

कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More