बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

नवी दिल्ली | वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरातील 19 किलो सिलेंडरच्या दरात 250 रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलेंडरसाठी (LPG Cylinder) 2253 रूपये मोजावे लागणार आहे. तर घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत.

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 10 दिवसांपूर्वीच मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर असल्याने नागरिकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. 50 रूपयांची दरवाढ झाल्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरसाठी सध्या मुंबईत 949.50 रूपये मोजावे लागत आहेत.

दरम्यान, 22 मार्च रोजी व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडर स्वस्त झाल्यानंतर सिलेंडरचे दर स्थिर होते. मात्र, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यवसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 250 रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर जारी, वाचा ताजे दर

“अटलजींच्या काळात लोकशाही पाहिली, आता हुकुमशाहीचा अनुभव घेतोय”

“मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरू दे दारोदारी”

Sharad Pawar: UPA अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत, रोहित पवार म्हणाले…

Narendra Modi: पंतप्रधान मोदी सर्वांत शक्तिशाली भारतीय; वाचा दुसऱ्या क्रमांकावर कोण?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More