मुंबई | महागाईने सर्वसामान्यांचं जगणं हैराण केलं आहे. 8.3 इतका महागाईचा निर्देशांक गेला आहे. अशातच पेट्रोलियम कंपन्यांनी LPG घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे.
यापु्र्वी नवीन गॅस कलेक्शनसाठी 1450 रूपये द्यावे लागायचे. आका यात 750 रूपयांची वाढ केल्याने आता नागरिकांना यासाठी 2200 रूपये मोजावे लागतील.
या व्यतिरीक्त रेग्युलेटरसाठी 250, पासबुक 25 आणि पाईपसाठी 150 रूपये वेगळे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता नवीन गॅस सिलेंडर घेऊ इच्छिणाऱ्यासाठी नवा सिलेंडर 3,690 रूपयाला पडणार आहे.
याशिवाय इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी पाच किलोच्या गॅस सिलेंडर ठेवीतही 350 रुपयांची वाढ केलीये. पू्र्वी 800 रूपयांना मिळणारा गॅस आता 1150 रूपयांना मिळणार आहे. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्याता नाकारता येत नाही.
थोडक्यात बातम्या
“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”
प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारण्याचे कारण काय?; शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं
‘आदित्य ठाकरेंचं लवकर शुभमंगल होवो आणि…’; भाजप खासदाराच्या खास शुभेच्छा
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येतबाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
Comments are closed.