महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; गॅस सिलिंडरचे दर ‘तब्बल’ इतक्या रुपयांनी झाले स्वस्त

LPG Price Cut l जूनच्या पहिल्याच दिवशी एक आनंदाची बातमी आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर 72 रुपयांनी कमी केला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्याचा हा सलग तिसरा महिना आहे. त्यामुळे आता व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात :

ऑइल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या म्हणजेच 14.2 किलो गॅसच्या दरात कोणतीही कपात केली नाही. त्यामुळे घरगुती गॅसच्या किमती त्याच कायम ठेवल्या आहेत आणि त्याच्या दरात देखील कोणताही बदल केलेला नाही. IOCL वेबसाइटनुसार, नवीन दर आज 1 जून 2024 पासून लागू करण्यात आला आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर सलग तिसऱ्या महिन्यात कमी करण्यात आले आहेत. 1 महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी कमी केली होती. मे महिन्यात सिलिंडरची किंमत नवी दिल्लीत 1745.50 रुपये, कोलकात्यात 18659रुपये, मुंबईत 1698.50 रुपये आणि चेन्नईत 1911 रुपये होती.

LPG Price Cut l जाणून घ्या तुमच्या शहरातील गॅसचे दर :

दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 69.50 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता 1676 रुपयांना व्यावसायिक गॅस मिळणार आहे. तसेच कोलकातामध्ये सिलिंडरचे दर 72 रुपयांनी कमी झाले आहेत. आता येथे सिलिंडर 1787 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत सिलिंडर 69.50 रुपयांनी कमी होऊन 1629 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत 1840.50 रुपये झाली आहे. चंदीगडमध्ये 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1697 रुपयांना मिळणार आहे. पाटण्यात त्याचा नवा दर 1932 रुपये झाला आहे.

एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 30 रुपयांपेक्षा जास्त कपात करण्यात आली होती. या कपातीनंतर दिल्लीत त्याची किंमत 1764.50 रुपये झाली. एप्रिलमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर कोलकात्यात 1879 रुपये, मुंबईत 1717.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1930 रुपयांना उपलब्ध होते.

News Title – LPG Price Cut on 1st June 2024

महत्वाच्या बातम्या-

अजित पवार गटाचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? ‘या’ नेत्याचा मोठा आरोप

या तीन राशींचे जून महिन्यात नशीब उजळणार; मिळेल सुख, समृद्धी अन् संपत्ती

अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; पोलिसात तक्रार दाखल

शरद पवारांना सर्वात मोठा धक्का बसणार?; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

“मोदी पंतप्रधान होणार नाहीत, लोकांनी केवळ स्टंट म्हणून त्यांच्याकडे पाहावं”