Top News देश

“ब्राह्मणांना भाजपशिवाय पर्यायच नाही, इतर ठिकाणी त्यांना सन्मान मिळत नाही’; भाजप नेत्याचं वक्तव्य

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या निवडणुकांसाठी आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आठमधील दोन उमेदवार हे क्षत्रिय आणि दोन ब्राह्मण देण्यात आल्याने जातीय समिकरणांच्या आधारे उमेदवार देण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. अशातच उमेदवारी मिळालेले भाजपचे उमेदवार हरिद्वार दुबे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भाजप वगळता कोणी ब्राह्मण सन्मान देत नाही. भाजप आणि ब्राह्मणांचे एवढे चांगले संबंध आहेत की ते शब्दात मांडता येणार नाही. सर्वांना ठाऊक आहे ब्राह्मण कोणाच्या बाजूने जाणार? उगाच काही लोकं या गोष्टीला हवा देतात. ब्राह्मण भाजपबरोबरच राहणार, असं दुबे प्रसारमाध्यामांशी बोलताना म्हणाले.

ब्राह्मण ससुर जाएगा कहां, अशी दुबे यांची पहिली प्रतिक्रिया होती. ब्राह्मण ससुर जाएगा कहां, तुम्हीच सांगा कुठे जाणार ब्राह्मण, असं दुबे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दुबे यांनी विश्वास व्यक्त करताना वापरलेल्या भाषेमुळे नव्या वादाला तोंड फुटत राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘पराभव साजरा करायलाही नशीब लागतं’; धनुभाऊंना पंकजाताईंकडून प्रत्युत्तर!

जम्मू-काश्मिरमध्ये जमीन खरेदी करता येणार मात्र अद्यापही ‘या’ जमिनी खरेदी करता येणार नाहीत!

दसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं- चंद्रकांत पाटील

“सरकारने न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली, आज आमची मागणीही मान्य झाली”

‘पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही’; शिवसेनेचं पुन्हा राणेंवर टीकास्त्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या