पोस्ट वर ‘जय श्री राम’ म्हणणाऱ्याला लकी अलीने दिलेलं उत्तर चर्चेत!

मुंबई | देशभरात लकी अलींचे (Lucky Ali) भरपूर चाहते आहेत. 1990 च्या दशकात लकी अली इंडी-पॉपमधील एक महत्त्वाचा व्यक्तिमत्त्व होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने सुपर-हिट सिंगल्स आणि अल्बम देखील होते.

लकी अलीने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती हे खूप कमी जणांना माहिती आहे. कुवरा बाप, छोटे नवाब, ये हैं जिंदगी, एक बाप चे बेटे, आणि गिन्नी और जॉनी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. लकी अलीने 1997 मध्ये “सुनो” नावाचा पहिला अल्बम रिलीज केला.

त्यानंतर लकी अलीला बॉलीवूडला आपला सुंदर आवाज देण्याची संधी मिळाली, त्याने एक पल का जीना आणि ना तुम जानो ना हम सादर केलं आणि ते दोघेही 2000 मध्ये कहो ना…प्यार है मध्ये प्रदर्शित झालं.

लकी अलीचे चाहते आणि प्रशंसक नेहमीच त्याच्या पोस्टची प्रशंसा करतात आणि कौतुक करतात. सोमवारी लकी अलीने त्याच्या फेसबुक पेजवर एक फोटो शेअर केला. फोटो प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल होता.

लकीने वादग्रस्त काहीही पोस्ट केले नसले तरीही, त्याच्या पोस्टकडे काही कारणांमुळे सर्वांचं लक्ष वेधवं गेलं. लोक जय श्री राम आणि हर हर महादेव अशा हिंदू धार्मिक घोषणा देऊ लागले तर दुसरीकडे अनेकांनी मुस्लिम धार्मिक नारे अल्ला हू अकबरवर कमेंट केले आणि काही मिनिटांतच त्यांचा कमेंट बॉक्स भरून गेला. याला लकी अलीने प्रत्युत्तर दिलं आहे. जय श्री राम म्हणणाऱ्याला लकी अलीने तू माझा भाऊ आहेस, असं उत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-