बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूझीलंडला धक्क्यावर धक्के! भारताविरूद्धच्या सामन्याआधी 2 दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त

मुंबई | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तान संघाने दारूण पराभव केला आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला पुढील प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. 31 ऑक्टोबर रोजी भारताचा पुढील सामना न्यूझीलंड संघासोबत असणार आहे. त्या सामन्याआधी न्यूझीलंड संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टिल भारताविरुद्ध सामन्यात मुकण्याची शक्यता आहे. पाकविरूद्ध सामन्यात हॅरिस रॅफने टाकलेल्या चेंडू त्याच्या पायाच्या अंगठ्याला लागला आहे. त्यामुळे पुढील सामन्यात तो खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण केली जात आहे. त्या सामन्यात मार्टिन गप्टिल 17 धावा काढून बाद झाला होता.

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू लॉकी फर्ग्युसन सुद्धा भारताविरोधात सामना खेळणार नाही. मंगळवारी सराव करताना फर्ग्युसनला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेला न्यूझीलंडने संघात घेतलं आहे.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, नामिबिया, स्कॉटलंड आणि अफगाणिस्तान संघ ब गटात आहेत. या गटात पाकिस्तान पहिले दोन सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्या खालोखाल अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

थोडक्यात बातम्या-

“इतिहास काढला तर लक्षात येईल, हमाम में सब नंगे है”

“माझं नाव ज्ञानदेवच पण, बायको मला प्रेमानं दाऊद म्हणायची”

“फडणवीस इथं येऊन गाजर वाटून गेले असतील”

कोरोना हा मोसमी आजार? वैज्ञानिकांच्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More