बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचं नाव घेऊन मी पुन्हा येईनचं सोंग करतंय”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काचे राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपकडून चक्का जाम आंदोलन केलं होतं. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीसांवर टीका करण्यास सुरवात केली आहे.

फडणवीस एकटेच संन्यास घेणार आहेत की मोदीजींना ही सोबत नेणार आहेत? ओबीसी आरक्षणाचा बळी देण्यात दोघांचा वाटा आहे म्हणून विचारलं, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी लगावला आहे. लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचं नाव घेऊन मी पुन्हा येईनच सोंग करतंय, अशी टीका देखील रूपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

दोन दिवसांपुर्वी भाजपच्या चक्का जाम आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांनी ‘आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचं आरक्षण परत आणून दाखवतो. जर असं करून दाखवलं नाही तर राजकीय संन्यास घेईल, असं म्हटलं होतं. राज्य सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं महत्व ताटातल्या चटणी, कोशिंबीर प्रमाणे आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारे ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले त्यामुळे एक तर आरक्षण द्यावं लागेल नाहीतर खुर्ची खाली करावी लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दरम्यान, भाजपच्या या आंदोलनावर रूपाली चाकणकर यांनी टीका केली होती. 1990 साली मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर देशभरात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता आणि योगायोग असा की त्यानंतर मंडल विरूद्ध कमंडल हा वाद कुणी चालू केला हे समस्त देशाला ठाऊक आहे, असा टोला त्यांनी याआधी लगावला होता.

थोडक्यात बातम्या-

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

‘तुझ्या दिसण्यामुळं तुझं अभिनेत्री होणं कठीण’, ‘या’ अभिनेत्रीनं मुलीला दिला होता सल्ला

“वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो”; भरसभेत वडेट्टीवारांचा शिवसेनेवर घणाघात

“…तर प्रीतम मुंडे खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवतायत हे सिद्ध होईल”

नागरिकांनो सावधान! आज देखील महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More