केंद्र सरकारचं नवं अॅप, आता ‘आधार’ एका क्लिकवर!

नवी दिल्ली | डिजीटल इंडियाला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता आधार कार्ड किंवा त्याची प्रिंट सोबत ठेवण्याची गरज नाही, कारण त्यासाठी केंद्रानं नवं अॅप लॉन्च केलं आहे.

mAadhaar असं या अॅपचं नाव असून सध्या ते फक्त अॅड्रॉईड फोनसाठीच उपलब्ध आहे. लवकरच आयओएस फोनसाठीही अॅप लॉन्च केलं जाणार आहे. 

प्ले-स्टोअरवरुन हे अॅप डाऊनलोड करता येईल. या अॅपवर नोंदणी केल्यानंतर एका पासवर्डच्या सहाय्याने आधार उपलब्ध होऊ शकेल.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या