बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माढ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर | माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्याचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.  माढा तालुक्यातील जनतेच्या मनातील परिवर्तन घडवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे कांबळे यांनी म्हटलं आहे.

शिवाजीराजे कांबळे यांच्या प्रवेशावेळी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत आणि माढा तालुक्याचे युवा नेतृत्व पृथ्वीराज सावंत उपस्थित होते. भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारी येथे त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी कारखाना शेतकी अधिकारी वाघ साहेब, परिते गावचे सरपंच माणिक (आण्णा) लांडे, अकुंबे गावचे माजी सरपंच धनाजी शिरसागर, बर्डीचे सरपंच कवडे सर, आष्टीचे वकील व्यवहारे साहेब, प्रमोद वसेकर काका, टेळे वडोलीचे सरपंच तानाजी गाडे, अरविंद खरात कांतीलाल टेळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार संजय कोकाटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More