माढा शरद पवारांना पाडा; सोशल मीडियात मेसेज व्हायरल

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे सोशल मीडियात आता वातावरण पेटताना दिसतंय. 

माढा शरद पवारांना पाडा, हा मेसेज आता व्हॉट्सअॅप तसेच फेसबुकवर जोरदार शेअर केला जातोय. माढा मतदारसंघातील अनेक ग्रुप्समध्ये सध्या हा मेसेज फिरतोय. 

देशातील बदलत्या राजकीय समिकरणांमुळे शरद पवारांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचा कळतंय. मात्र माढ्यात त्यांना विरोध होत असल्याचं चित्र आहे. 

2009 साली शरद पवार या मतदारसंघातून निवडून गेले होते. मात्र त्यावेळी त्यांनी या भागासाठी काहीच केलं नाही, असंही या मेसेजमध्ये म्हटलं जात आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांनी घेतली मोठी जबाबदारी; यश मिळणार का???

-पंतप्रधान भाजपचा होणार असेल तर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे- संजय राऊत

अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून आदरांजली

…तर 2019 मध्ये एनडीएतल्या मित्रपक्षांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल- संजय राऊत

ए दिल है मुश्कील…, व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं

Google+ Linkedin