बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरोग्य विभागातील परिक्षेच्या गोंधळाला राजेश टोपेच जबाबदार त्यांनी राजीनामा द्यावा”

मुंबई | आरोग्य विभागाच्या परिक्षेवरून महाविकास आघाडीच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता सलग तिसऱ्या वेळा आरोग्य विभागाच्या परिक्षेवरून गोेंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाविकास आघाडीवर भाजपने टीकेची झोड उठवली आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी या प्रकरणात आक्रमक होत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या गोंधळाला सर्वस्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी या गोंधळाची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजपतर्फे माधव भंडारी यांनी केली आहे.

काळ्या यादीत टाकलेल्या न्यासा या कंपनीला महाराष्ट्र सरकारने परिक्षेचं कंत्राट दिलं होतं. त्यानंतर आरोग्य विभागाच्या परिक्षेचे केंद्र हे उत्तर प्रदेशातील असल्याचं उघडकीस आलं आणि ऐनवेळी आरोग्य विभागाची परिक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली, असं असताना आता तिसऱ्या वेळी गोंधळ उडून प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचल्या नाहीत, तसेच मुंबईत सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता भाजपने आक्रमक होत थेट आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता माधव भंडारींच्या या मागणीचं पुढे काय होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“…किंवा तू तरी गांजा मारून व्हिडीओ पोस्ट केलाय”

“मी तर आधीपासून सांगत आहे, राज्य सरकारनं आता तरी…”; नवाब मलिकांनी केली महत्वाची मागणी

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल; उस्मानाबादमधील ‘त्या’ घटनेवरून चाकणकर कडाडल्या

उस्मानाबादच्या डान्स बारवरून अमोल मिटकरी आक्रमक, म्हणाले…

टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटचा पाकविरूद्ध जबरदस्त विक्रम! आजच्या सामन्यात मोठा धमाका करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More