Top News

अटलजींची तुलना करायची झाली तर केवळ नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल!

मुंबई | अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झाली तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, असं भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र एकता अभियान आणि राजहंस प्रकाशन तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अटलजींचा सहवास ज्यांना लाभले ते भाग्यवान आहेत. देशातील सगळ्या महानगरांना रस्त्यांनी जोडल्यामुळे देशातील गाव महानगरांना जोडली. यामुळे देशाचा वेगवान विकास झाला. जगभरात विखूरलेल्या भारतीयांना एकजूट करण्याचे काम सगळ्यात जास्त अटलजींनी केले. त्यांच्यामुळे अनिवाशी भारतीयांनी भारतात गुंतवणूक केली, असं ते म्हणाले.

अटलजींनी देशाच्या अण्विक विकासामध्ये मोलाचे योगदान दिल्यानेच अमेरिकेसारख्या देशाला भारताबरोबर अणूकरार करावा लागल्याचे भांडारी यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या-

-वेळ पडली तर 100 टोळ्यांवर मोक्का लावणार; संदिप पाटलांचा भाई-दादांना इशारा

-सरकारच्या या निर्णयामुळे रात्री एटीएममध्ये कॅश मिळणार नाही?

-सचिन, धोनी, विराटलाही जमलं नाही; ते रुषभ पंतनं करुन दाखवलं!

-प्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक जोनस म्हणतो ‘मी जगात सर्वांत भाग्यवान’

-पाठ्यपुस्तकात धडा मिल्खा सिंगचा आणि फोटो फरहान अख्तरचा…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या