नाशिक महाराष्ट्र

“आठ महिने मंत्रालयात पाऊल न टाकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही”

नाशिक | महाराष्ट्राला 25 वर्ष मागे घेऊन जाणारा ठाकरे सरकारचा कारभार आहे आणि मुख्यमंत्र्यांबद्दल तर बोलायचं काम नाही. आठ ते नऊ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही ते काम उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलंय, अशी टीका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली.

आज नाशिकमध्ये माधव भांडारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. एक वर्षात केंद्रावर टीका करण्याखेरीज दुसरं कोणतं काम केलं हे सरकारने सांगावं, अशी टीका भांडारी यांनी केलीये.

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. खरं तर जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासल्याचं हे एक वर्ष म्हणावं लागेल, असा टोला माधव भांडारी यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

या एका वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरलं. वाढीव वीज बिले देऊन राज्यातील जनतेची लूट केली. कोरोना काळात राज्य सरकारला समाधानकारक कामगिरी करता आली नाही, असं माधव भांडारी यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

मंदिरातील पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का?- तृप्ती देसाई

ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी; शिवसेना खासदाराची मागणी

अभिजीत बिचुकले यांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

“मुख्यमंत्री असताना आरक्षण देता आलं असतं, पण शरद पवारांनी दुर्लक्ष केलं”

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या