पुणे महाराष्ट्र

…म्हणून राष्ट्रवादीच्या पदवीधर अध्यक्षाने थेट कॅनडाच्या पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र

पुणे | पॉपस्टार सिंगर रिहानाने दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायद्या विरोधातील आंदोलनाचं समर्थन केलं. त्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांनी यावर प्रतिक्रिया देत रिहानाला फटकारलं. यावरून चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या माधव पाटील या युवकाने थेट कॅनडाच्या पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. माधव पाटील याचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

गेले 70 दिवस शेतकरी थंडीत, ऊन वाऱ्यात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तेव्हा कॅनडाचा नागरिक असलेल्या अक्षयकुमारला शेतकऱ्यांची काळजी वाटली नाही. हे या पत्राद्वारे माधव पाटील यांनी कॅनडाच्या पंतप्रधांना लक्षात आणून दिलं आहे.

#IndiaAgainstPropoganda #IndiaTogether असा हॅशटॅग चालवून भारताची एकता टिकवून ठेवा, असं आवाहन अक्षय कुमार आणि इतर सेलिब्रिटींनी केलं होतं. भारत म्हणजेच शेतकरी आणि शेतकरी म्हणजेच भारत. एकतेच्या नावाखाली त्या शेतकऱ्यांना अक्षयकुमार साफ विसरला, असा टोला माधव पाटीलने अक्षयला लगावला.

कॅनडा सरकारने अक्षय कुमार यांना कॅनडा सरकारचा सर्वोच्च पुरस्कार द्यावा, असा खोचक सल्लाही माधव पाटीलने पंतप्रधानांना या पत्राद्वारे दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…हे पहिले केंद्राला सांगा’; अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं

‘तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण आता…’; या मराठी दिग्दर्शकाने सचिनला सुनावलं

“शेतकऱ्यांप्रमाणे आक्रमक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?”

“आंदोलक शेतकरी देशद्रोही मग अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का?”

“भाजपच्या नेत्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या