“कोरोनापेक्षा सध्या सुरू असलेलं राजकारण भयंकर”
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. सध्याच्या घडीच्या राजकारणावरून सामान्य नागरिकांसह समाजातील थोर व्यक्तींकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. जेष्ठ साहित्यीक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक (Madhu Mangesh Karnik) यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी दर्शवली आहे.
सध्याचे जे राजकारण सुरू आहे ते माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधी पाहिले नसल्याची खंत कर्णिक यांनी व्यक्त केली आहे. दररोज सुरू असलेल्या घडामोडिंमुळे कोरोनापेक्षा (Corona) सध्या सुरू असलेले राजकारण भयंकर आहे, असंही मधू मंगेश कर्णिक म्हणाले आहेत.
हे सर्व असंच सुरू राहिलं तर एकवेळ कोरोनावर मात करणे शक्य पण राजकारणावर मात करणे शक्य नसून पुढची 80 वर्षे कशी जातील. या देशाचं काय होईल हे माहिती नाही, असं देखील जेष्ठ साहित्यीक मधू मंगेश कर्णिक म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दररोज भांडणे, आरोप-प्रत्यारोप सुरू असून तुम्ही राज्यकारभार कधी करणार?, असा सवाल देखील कर्णिक यांनी उपस्थित केला आहे. तर सकाळी पैसे खर्च करून पेपर घेतल्यानंतर यांची भांडणं आणि एकमेकांवरील दोषारोप त्यामुळे सकाळी पेपर वाचावासा वाटत नाही, अशी नाराजी देखील कर्णिक यांनी व्यक्त केली आहे.
थोडक्यात बातम्या-
महागाईचा फटका, पाच दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं, वाचा ताजे दर
पोस्टाची भन्नाट योजना, ‘इतक्या’ वर्षात तुमचे पैसे होतील डबल
मोठी बातमी! प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा झटका
“युक्रेनने नाटो ऐवजी आमच्या मुख्यमंत्री ठाकरेंकडेच मदत मागायला हवी होती”
‘मी राज्यात मंत्री असतो तर मुंबईत…’; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Comments are closed.