पुणे महाराष्ट्र

मुलाच्या भाजप प्रवेशावर मधुकर पिचडांचं मोठं वक्तव्य

अहमदनगर | देश पातळीवर भाजप उत्तम काम करतंय. आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. काळानुसार बदलत वैभवने घेतलेला निर्णय योग्य आहे, असं म्हणत राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्या भाजप प्रवेशाला आपली सहमती दर्शवली आहे.

आज अकोल्यात कार्यकर्ता मेळावा घेऊन वैभव पिचड यांनी आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा केली. यावेळी पिचड बोलत होते.

तालुक्याचा विकास महत्वाचा आहे. तो साधायचा असेल तर विकासाच्या दिशेने चालणाऱ्या पक्षाशी सहमत होणं गरजेचं आहे. भाजपला लोकांनी स्विकारलं आहे. त्यामुळे वैभवचा निर्णय योग्यच असल्याचं मधुकर पिचड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे आपण भाजपत जात असल्याचं स्पष्टीकरण वैभव पिचड यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपात प्रवेश करताना पिचड म्हणतात, मी पवारांचे उपकार कधीही फेडू शकत नाही!

-…म्हणून भाजपने जोरात इनकमिंग चालवलंय- सुशीलकुमार शिंदे

-“अडचणीचा काळ असला तर काय झालं, आम्ही साहेबांच्या सोबत आहोत”

-राजीनाम्याच्या निर्णयानंतर चित्रा वाघ सोशल मीडियावर ट्रोल!

-रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीनं दिली बढती; ‘या’ महत्वाच्या पदावर निवड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या