Top News खेळ

अजिंक्यच्या नावाचा मराठी चित्रपटसृष्टीशी आहे हा जुना संबंध; मधुकर रहाणेंनी सांगितली नावामागची खास बात!

मुंबई | अजिंक्य रहाणे हे नाव सध्या प्रत्येकाच्या ओठावर आहे. रहाणेने आपल्या नावप्रमाणे ‘अजिंक्य’ अशी कामगिरीही केली आहे. ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मैदानावर पराभूत करत बोर्डर-गावसरकर कसोटी मालिका खिशात घातली आणि चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

अजिंक्य रहाणेचे वडील मधुकर रहाणे यांनी त्याचं नाव अजिंक्य का ठेवलं यामागची एक खास बात ‘मटा’सोबत बोलताना सांगितली आहे. नावाप्रमाणे अजिंक्य हा आपल्या देशासाठी तशा प्रकारची कामगिरी करत आहे.

अजिंक्यचा जन्म झाला तेव्हा मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देव चांगलं काम करत होता. अजिंक्य देवच्या नावावरून आम्ही माझ्या मुलाचे नावही अजिंक्य ठेवलं असल्याचं मधुकर रहाणे यांनी सांगितलं.

दरम्यान, अजिंक्य रहाणे आत्तापर्यंत ज्या ज्या कसोटीमध्ये भारताचं कर्णधारपदी राहिला आहे त्यामध्ये त्याने एकही कसोटी सामना हरलेला नाही. त्यात आता ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा त्यांच्याच भूमित पराभव करत आपला विक्रम नावाप्रमाणे अबाधित ठेवला आहे.

थोडक्यात बातम्या-

इंडियाचं विमान मुंबईत लँड! पवारांच्या मध्यस्थीमुळे भारतीय संघाच्या शिलेदारांना क्वारंटाईनची बाऊण्ड्री नाही?

दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री घेणार लस!

सर्व्हरच बंद पडल्यानं लसीकरणात अडचणी- आरोग्य मंत्री राजेश टोप

थकीत वीजबिलावरून सरकारला रोहित पवारांचा घरचा आहेर; म्हणाले

‘कोणतीही अडचण असली तरी बैठकील यायचंच’; दांडीबहाद्दर मंत्र्यांना अजित पवारांनी खडसावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या