अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

मुंबई | पुण्यातून अभिनेत्री माधुरी दीक्षितला भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मिड डे या इंग्रजी वृत्तपत्रानं यासंदर्भात वृत्त दिलंय.

2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2019 सालीही भाजप सेलिब्रेटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. नुकतीच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काही सेलिब्रेटींची भेट देखील घेतली होती.

भाजपने एक देशव्यापी सर्वेक्षणसुद्धा केलं आहे. या सर्वेक्षणानुसार माधुरीसाठी मुंबई आणि पुण्यातील मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली

माधुरीला पुण्यातून चांगला प्रतिसाद असल्याचं या सर्वेतून समोर आल्याचं कळतंय. त्यामुळे पुणे लोकसभेसाठी भाजपनं माधुरीचं नाव घोषित केल्यास आश्चर्य वाटायला नको. 

महत्वाच्या बातम्या-

-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

-अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं पहिलं हॉट फोटोशूट, पाहा फोटो…

-कर्जाची मुद्दल देतो, व्याज विसरा- विजय मल्ल्या

Google+ Linkedin