‘त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये घेतले; माधुरीच्या गौप्यस्फोटाने सगळीकडे एकच चर्चा!

Madhuri Dixit | बाॅलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दिक्षित कायम चर्चेत असते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तीने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. माधुरीचे चित्रपट बॅाक्स ऑफिसवर सुपरहिट होणारच याची खात्री तिच्या चाहत्यांना असायची. दरम्यान, माधुरीने एका चित्रपटातील सीनसाठी चक्क एक कोटी रुपये घेतले होते. त्याबद्दल माधुरीने गौप्यस्फोट केला आहे.

सीनमुळे राडा-

माधुरीने (Madhuri Dixit) 80 आणि 90 च्या दशकात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. आज सुद्धा माधुरीसाठी तरुणवर्ग तेवढाच वेडा आहेत. माधुरीचे चित्रपट लोक आजही मोठ्या आवडीने बघतात. मात्र, माधुरीच्या एका सिनेमातील सीनमुळे राडा झाला होता. या चित्रपटातील एका सीनसाठी माधुरीने तब्बल 1 कोटी रुपये घेतले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

एका सीनसाठी एक कोटी रुपये-

माधुरीने (Madhuri Dixit) ‘दयावान’ या चित्रपटात अभिनेता विनोद खन्नासोबत काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित होताच इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. या चित्रपटात माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यामध्ये काही इंटीमेट सीन्स होते. याच चित्रपटावेळी माधुरीने एका सीनसाठी एक कोटी रुपये घेतले होते. त्या काळात फक्त एका दृश्यासाठी एक कोटी रुपये मोजणे ही मोठी गोष्ट होती. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा विनोद खन्ना आणि माधुरीच्या किसिंग सीनने खळबळ उडवून दिली होती.

हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळी या चित्रपटातील असे बोल्ड सीन्स पाहिल्यानंतर सर्वांनी माधुरीवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या चित्रपटावर टीका इतकी वाढली की, दिग्दर्शक फिरोज खान यांना चित्रपटातून ती दृश्ये काढून टाकण्याची नोटीस पाठवण्यात आली. पण फिरोज खान यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि चित्रपटातील एकही सीन कापला नाही.

News Title : Madhuri Dixit took one crore for the scene

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ 25 वर्षीय अभिनेत्रीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू, नक्की काय घडलं?

मोठी बातमी! मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण; बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप

‘ही’ अभिनेत्री अंडरवर्ल्ड डाॅनसोबत बांधणार होती लग्नगाठ, स्वतः केला खुलासा

कुणाचं ब्रेकअप तर कुणाचा घटस्फोट…; यंदा ‘या’ कलाकारांचा संसार मोडला

शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण