मुंबई | दिल्ली विमानतळावरून माझ्या सफदरंजग लेनच्या सरकारी निवासस्थानापर्यंत जाईपर्यंत किमान दहावेळा तरी माझा कॉल ड्राप होतो. सरकार मोठमोठ्या घोषणा करतं. प्रत्यक्षात काहीच घडताना दिसत नाही. त्यामुळे कॉल ड्रॉप होत नाही अशी मोबाईल सेवा आता सरकारनेच आम्हाला सुचवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत राऊत यांनी देशभरात मोबाईलधारकांना भेडसावणाऱ्या कॉल ड्रापच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधलं. राज्यसभेत कॉल ड्रॉपच्या मुद्यावरून राऊतांनी सरकारला गुगली टाकली.
भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल नेटवर्क आहे. मात्र ही समस्या कायम आहे. त्यामुळे सरकारने कॉल ड्राप रोखू न शकणाऱ्या कंपन्यावर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
दरम्याम, गेल्या तीन-चार वर्षांपासून कॉल ड्रापची समस्या कमी करण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
“निर्भयाची आई ही माझी ओळख अभिमानास्पद, आज ती असती तर…”
आता नवऱ्याला कधीच नाही सांगू शकणार ही गोष्ट; दोषी अक्षयच्या पत्नीची इच्छा अपूर्ण
महत्वाच्या बातम्या-
अन्नदात्यासाठी अन्नत्याग… साऱ्या महाराष्ट्रात झाले अन्नत्याग आंदोलन
कंपन्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये- नरेंद्र मोदी
Comments are closed.