मुंबई | लेखक व गीतकार जावेद अख्तर (Jawed Akhtar) यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) विरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. हा दावा अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातून अन्य न्यायालयात वर्ग करण्यात यावा यासाठी कंगनाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
न्यायालयाने कंगनाला धक्का देत 9 मार्च रोजी तिचा हा अर्ज फेटाळून लावला आहे. एखादे न्यायालय फौजदारी न्याय नि:ष्पक्षपणे किंवा वस्तुनिष्ठपणे करू शकत नसल्याचे दिसून आले तर तो खटला वर्ग केला जाऊ शकतो. सदर प्रकरणी न्याय मिळणार नाही या भीतीमुळे खटला वर्ग केला जाऊ शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने कंगनाचा अर्ज फेटाळला.
जेव्हा लोकांचा खटल्याच्या नि:ष्पक्षतेवर विश्वास कमी होईल तेव्हा कोणताही पक्ष खटला अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी करू शकतो. मात्र, खटला योग्य निष्पक्षपणे चालवला जाणार नाही, ही भीती वाजवी व अनुमानावर आधारित असली पाहिजे. काल्पनिक व तर्कसंगत नाही, असं म्हणत न्यायालयाने कंगनाला फटकारलं आहे.
दरम्यान, नि:ष्पक्ष खटला न चालवण्याची भीती वाजवी असावी लागते. तसेच कंगनाला न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले म्हणून संबंधित दंडाधिकारी न्यायालय पक्षपातीपणा करत होते असं म्हणता येणार नाही, असं निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“पावसात भिजून देखील राष्ट्रवादीचे 54 आमदारच निवडून आले”
‘सर्व प्रियजनांना आणि नॉटी जनांना…’; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता; राज्यात ‘या’ भागात उकाडा वाढणार!
“नरेंद्र मोदी फक्त 2 तास झोपतात, आता झोपच लागू नये म्हणून…”
“घाबरू नका, नरेंद्र मोदींनंतर भाजप टिकू शकणार नाही”
Comments are closed.