महाराष्ट्रात 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार!

मुंबई | ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 43 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या, त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात तब्बल 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 

महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार करणाऱ्यां कंपन्यांमध्ये देश-विदेशातील नामांकीत कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्ट आणि रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय झिलस्तोव्ह यांचीही भेट घेतली. या भेटीत रोजगार निर्मितीबाबत चर्चा झाल्याचं कळतंय.