मुंबई | पुरामध्ये वाहून गेलेल्या मोठ्या जनावरासाठी 30 हजार रूपये, लहान जनावरासाठी 16 हजार रूपये तर शेळी- मेंढीसाठी 3 हजार रूपये मदत राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे.
पुरामुळे अनेक जनावरं आजारी पडत आहेत. या आजारी जनावरांवर सरकारकडून मोफत उपचार केले जाणार असल्याचीही माहिती जानकरांनी दिली.
राज्याच्या पशुसंवर्धन खात्याकडून 20 डॉक्टरांची टीम पुरग्रस्त भागात कार्यरत आहे. केरळमधून बोलवण्यात आलेले 10 डॉक्टर्सही अहोरात्र काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मोफत उपचाराबरोबरच औषधं आणि लसीकरणही सरकारतर्फे मोफत देण्यात येणार असल्याचं जानकरांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्या’ तिघांसाठी सदाभाऊ खोत देवासारखे धावून आले…!
-हरियाणाच्या मुख्यमंत्र्याचं काश्मीरवरून वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…
-अजून मी म्हातारा झालेलो नाही- शरद पवार
-शिरूरकरांनी दिलेली मदत घेऊन खासदार अमोल कोल्हे पूरग्रस्तांच्या भेटीला
-ब्रह्मनाळमधील बोट उलटल्याची दुर्दैवी घटना; मृतांच्या संखेत वाढ…
Comments are closed.