बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरे-मोदी भेटीनंतर ‘वर्षा’वर तातडीची बैठक… शरद पवार, उद्धव ठाकरे अजित पवार हजर

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर आज ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होत आहे.

उद्धव ठाकरेंनी काल भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सीएए कायद्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत मतमतांतरे होत आहेत. कारण काँग्रेसने सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्याला जाहीर विरोध दर्शवला आहे.

भीमा कोरेगावचा तपास एनआयएला दिला आहे. मात्र तपास राज्यातील विशेष तपास पथकाद्वारे व्हावा अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे या भेटीत त्याबाबतही चौकशी होऊ शकते.

दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील त्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मनसेबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाले….

मालिकेतील कोणताच भाग वगळणार नाही; अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्र्यांना कोणी तरी समजवावे लागेल, संधी दिली तर मी समजावून सांगतो”

‘त्या’ व्हायरल व्हीडिओबाबत नवाब मलिकांचं स्पष्टीकरण; म्हणतात…

“वारिस पठाण हे लावारीस पठाण आहेत; समोर आले तर थोबाडीत देईन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More