बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भीकही कांदा दरांपेक्षा जास्त दिली जाते”; सदाभाऊ  खोत संतापले

नाशिक | गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना कांदा अत्यल्प दराने विकावा लागत आहे. शेतीत अनेक दिवस कष्ट करूनही कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. कांदा कवडीमोल किंमतीमध्ये विकावा लागत असल्याने शेतकरी सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत. त्यातच आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ  खोत यांनी कांदा दरांवरून महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

सद्यस्थितीतले कांद्याचे दर म्हणजे भिक मागून पैसे घ्यायचे आणि त्या बदल्यात कांदा द्यायचा, अशी अवस्था झालेली आहे, अशी जोरदार टीका सदाभाऊ खोत यांनी केली. सरकारने कांदा दराबाबत कोणतेच धोरण ठरविलेले नाही. जर कांद्याचे दर वाढले तर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, घटत्या दरांबाबत कोणतीच भूमिका नाही, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला.

भीकही कांदा दरांपेक्षा जास्त दिली जाते. जर कांदा दरांबाबत योग्य धोरण ठरविले नाही तर राज्याच्या कृषि मंत्र्यांना भीक मागून पैसे देणार, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. कांदा दरांबाबत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

दरम्यान, शेतकरी हिताच्या निर्णयाला सरकारकडून नेहमी दिरंगाई केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे दर 2 ते 3 रूपये किलो, असे आहेत. भिकाऱ्याला देखील अधिक भीक दिली जाते तो दर कांद्याला 1 रूपये किलो असा आहे. कांदा दरांसंदर्भात अंमलबजावणी न केल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाणार, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

थोडक्यात बातम्या- 

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील…’;पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

बुद्धी पाहूनच शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवा- इंदुरीकर महाराज

‘लवकर तुझा सिद्धू मुसेवाला करणार’; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More