बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यायालयाने नारायण राणेंना जामीन मंजूर केला, मात्र ‘या’ अटी देखील घातल्या!

महाड | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाने रात्री उशिरा जामीन मंजूर केला. त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी अटकेची कारवाई पूर्ण केली नसल्याने सरकारी वकिलाने मागितलेली पोलिस कोठडी नाकारल्याचे न्यायालयाने सांगितले. राणेंना मंजूर करण्यात आलेला जामीन हा सशर्थ आहे, म्हणजेच हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना काही अटी घालून दिल्या आहेत.

अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी लेखी हमी नारायण राणे यांच्याकडून घेण्यात आली आहे, तसेच राणे येत्या सोमवारी(३० ऑगस्ट)ला आणि पुढील महिन्यात १३ सप्टेंबर रोजी त्यांना रायगड पोलिसांच्या गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. न्यायालयानं यासंदर्भात आदेश दिलेत.

नारायण राणे यांना जामीन मंजूर करत असताना महाड न्यायालयाने आणखीही काही अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार, राणे यांच्या आवाजाचा नमुना पोलिसांना हवा असल्यास तो त्यांना द्यावा लागणार आहे. मात्र पोलिसांना तो घेण्यासाठी ७ दिवस आधी नोटीस द्यावी लागेल.  याशिवाय राणेंनी साक्षीदारांवर दबाव टाकता कामा नये, तसेच राणे यांनी पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशी तंबी देखील न्यायालयाने त्यांना दिली आहे.

दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर रात्री उशिरा राणे न्यायालयातून निघाले. ते थेट मुंबईकडे रवाना झाले. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलणं त्यांनी टाळले. मुंबईला जात असताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगे म्हणजेच माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे देखील होते.

थोडक्यात बातम्या-

जामिनावर सुटताच नारायण राणेंचं पहिलं ट्विट, म्हणाले,

बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भात जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

आनंदाची बातमी! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

“भाजपला सत्तेची भूक आणि लालच असल्याने राणेंना केंद्रात मंत्रिपद”

वातावरण तापलं! शिवसेना खासदाराच्या घरावर उमटले राणेंच्या अटकेचे पडसाद!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More