तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग…??- महादेव जानकर

पुणे |  तुमच्या चिन्हावर कसं लढणार ? तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं?, असा सवाल महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

भाजप माढा आणि बारामती रासपला देत होते. पण, चिन्ह भाजपचे देत होते म्हणून त्या जागा स्विकारल्या नाहीत, अशी माहितीही महादेव जानकर यांनी दिली.

ज्या पक्षाचं चिन्ह त्या पक्षाचा उमेदवार असतो. याला युती नाही बेकी म्हणतात, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

आमची युती भाजपसोबत आहे शिवसेनेसोबत नाही, असंही जानकर यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत रासपला जागा न दिल्याने जानकर चांगलेच संतप्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बहीण बहीण म्हणून जवळ गेलो पण तीने जबाबदारी घेतली नाही- महादेव जानकर

काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा! त्यांनाच माढ्यातून उमेदवारी?

माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदेनी उडवली मोहिते पाटलांची खिल्ली

आजच्या पार्थ पवार-लक्ष्मण जगताप भेटीने मावळमध्ये उलथापालथ घडणार?

अखेर अब्दुल सत्तारांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवणार