बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महादेव जानकरांनी विधानसभेसाठी भाजपकडे मागितल्या 57 जागा

नागपूर | आगामी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्षासाठी मी भाजपकडे 57 जागांची मागणी केली आहे, असं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितलं आहे. नागपूरच्या संताजी सांस्कृतिक सभागृहात रासपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

सध्या राज्यात रासपचे 98 जि.प. सदस्य, 18 नगरसेवक, 4 नगराध्यक्ष, 3 सभापती, 6 उपनगराध्यक्ष आणि 2 आमदार आहेत. हीच परिस्थिती लक्षात घेता आणि रासपची वाढलेली ताकद पाहता आम्ही भाजपकडे 57 जागा मागितल्या आहेत, असं जानकर म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजप प्रवेश असेच होत राहिले तर भाजपचा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर केली आहे.

दरम्यान, भाजप विधानसभेला रासपला किती जागा देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मोहन भागवतांना जेलमध्ये टाकतो; फक्त माझ्या हातात सत्ता द्या”

-जितेंद्र आव्हाड यांची राहुल गांधींना ‘ही’ कळकळीची विनंती…

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं रोखठोक प्रत्युत्तर!

-“…तर भारत बालाकोट एअर स्ट्राईकहून मोठा हल्ला पाकव्याप्त काश्मिरमध्ये करेल”

-शरद पवारांचा ‘हा’ अत्यंत विश्वासू सहकारी राष्ट्रवादीची साथ सोडण्याच्या तयारीत?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More