आरक्षणासाठी सर्व काही रेडी आहे; धनगरांना लवकरच आरक्षण मिळणार- महादेव जानकर

गोदिंया | धनगर आरक्षणासाठी सर्व काही रेडी आहे, धनगरांना लवकरच भाजप सरकार आरक्षण देणार आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

धनगर आरक्षणाबाबत केवळ केंद्राकडे शिफारश करणे बाकी आहे. ती येत्या एक ते दीड महिन्यात केंद्राकडे पाठवू. त्यामुळे आता लवकरच धनगर समाजाचा आरक्षणाचा मार्ग देखील मोकळा होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

समाजाच्या आरक्षणासाठी सर्व काही रेडी केलेले आहे. त्याची तारीख सांगत नाही पण येत्या एक ते दीड महिन्यांत आम्ही शिफारस पाठवू, असंही ते म्हणाले.

दरम्यान, नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मराठा समाजानंतर धनगर समाजाला भाजप सरकार आरक्षण देणार आहे का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाकावं!

-उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजपवाले जनतेला मूर्ख बनवतायेत!

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडणुकीसाठी करतोय असा प्रचार

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

-…तर गांधी घराण्याच्या बाहेरील काँग्रेस अध्यक्ष करून दाखवा!